मेहकर विधानसभेचे आता पर्यंतचे आमदार व निवडणूक इतिहास

             १९५१ साली लोकसभेच्या निवणुकीसोबत विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी विदर्भ मध्य प्रांतामध्ये होता. मध्य प्रांताची राजधानी नागपुर होती.१ नोव्हेंबर १९५६ मध्ये विदर्भ मुंबई राज्यात आला व १ मे १९६० रोजी मराठी भाषिकांचे महाराष्ट्र राज्य अस्तीत्वात आले. त्यामधील बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुका हा एक विधानसभेचा मतदारसंघ आहे. यामधील विधानसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा इतिहास पुढील प्रमाणे आहे.

निवडणूक  सन १९५१ (राज्य- मध्य प्रांत व वऱ्हाड) सर्वसाधारण मतदार राखीव संघ
विजयी उमेदवार: आनंदराव मारोतराव पवार (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ) प्राप्त मते१९७२९.
पराभूत उमेदवार: शंकरराव विठ्ठलराव देशमुख ( पक्ष शेतकरी कामगार पक्ष) प्राप्त मते १८५१८.
१९५१ मतदारसंघ अ.जाती राखीव विजयी उमेदवार: लक्ष्मण तुकोजी गवई (पक्ष शेतकरी कामगार पक्ष)मते १९४१५
पराभूत उमेदवार: तुकाराम नारायण साबळे (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)मते१५१९८.
मतदार संघातून सर्वसाधारण व राखीव असे दोन आमदार निवडूण दिल्या गेले.

निवडणूक सन १९५७ ( राज्य-मुंबई) डेटा उपलब्ध नाही.

निवडणूक सन १९६२(महाराष्ट्र राज्य)
विजयी उमेदवार: अण्णासाहेब देशमुख (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) प्राप्त मते २९९५७ .
पराभूत उमेदवार: किसन तुकाराम सांगळे (अपक्ष)प्राप्त मते १८८०३ जानेफळ अ.जा.मतदारसंघ, बळवंता पिराजी वानखडे (पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) प्राप्त मते १६९२०, उमेदवार महादु यशवंत भालेराव(पक्ष भारतीय जनसंघ) प्राप्त मते ७३६९.

निवडणूक सन १९६७
विजयी उमेदवार:सिताराम चिनकाजी लोढे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) प्राप्त मते २५२३२.
पराभूत उमेदवार जी.व्ही.टाले (आर पी आय)प्राप्त मते १९९८५.

निवडणूक सन १९७२
विजयी उमेदवार:सिताराम चिनकाजी लोढे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)प्राप्त मते ३००२२.
पराभूत उमेदवार: यादवराव विठोबा टाले (अपक्ष) प्राप्त मते २६५४८.

निवडणूक सन १९७८
विजयी उमेदवार: सुबोध केशव सावजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस इंदीरा)प्राप्त मते ३९१६३.
पराभूत उमेदवार: अनंत तुळशीराम बाजड (अपक्ष आरएसएस समर्थन प्राप्त उमेदवार) प्राप्त मते १६८४८.

निवडणूक सन १९८०
विजयी उमेदवार:किसनराव तुकाराम सांगळे(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस इंदीरा) प्राप्त मते ३८४८१.
पराभूत उमेदवार: आश्रु बळीराम काळे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस URSE) प्राप्त मते २२३८८.

निवडणूक सन १९८५

विजयी उमेदवार: सुबोध केशव सावजी (अपक्ष) प्राप्त मते ३१८१७.
पराभूत उमेदवार: रूपराव आयाजी रहाटे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस समाजवादी)प्राप्त मते २८१७७ ,ॲड.भास्करराव किसनराव सांगळे(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस इंदीरा).

निवडणूक सन १९९०
विजयी उमेदवार: सुबोध केशव सावजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस) प्राप्त मते ५४२१९.
पराभूत उमेदवार: प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) प्राप्त मते४४६०९.

निवडणूक सन १९९५
विजयी उमेदवार: प्रतापराव गणपतराव जाधव(शिवसेना)प्राप्त मते ७२७४४
पराभूत उमेदवार: सुबोध केशव सावजी(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)प्राप्त मते३९४७२ या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेसचे नेते श्याम उमाळकर यांनी शिवसेना उमेदवाराचा जाहीर प्रचार केला होता.

निवडणूक सन १९९९
विजयी उमेदवार: प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) प्राप्त मते ५६१३८.
पराभूत उमेदवार: सुबोध केशव सावजी (अपक्ष) प्राप्त मते २१६०७, किशोर गुलाबराव मापारी (अपक्ष), श्याम उमाळकर (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस), भास्करराव काळे (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी).

निवडणूक सन २००४ 
विजयी उमेदवार: प्रतापराव गणपतराव जाधव (शिवसेना) प्राप्त मते ८०२७७
पराभूत उमेदवार: भागवत म्हातारजी मगर(अपक्ष) ३५४५६ ,सुबोध केशव सावजी (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस).

निवडणूक सन २००९
विजयी उमेदवार: अ.जाती.राखीव मतदारसंघ .डाॅ.संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना)प्राप्त मते ९१४७५
पराभूत उमेदवार: ॲड.साहेबराव आश्रुजी सरदार (राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) प्राप्त मते ५८३८०.

निवडणूक सन २०१४
विजयी उमेदवार: अ.जाती राखीव मतदारसंघ .डाॅ.संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना) प्राप्त मते ८०३५६
पराभूत उमेदवार: लक्ष्मण जाणुजी घुमरे (भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)प्राप्त मते ४४४२१, सौ.अश्वीनी चरण आखाडे( राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी) १२७५९, नरहरी गवई(भाजपा) १७०३५, भाई प्रदीप अंभोरे (शेकाप)२५३४.

निवडणूक सन २०१९
विजयी उमेदवार: अ.जाती.राखीव डाॅ.संजय भास्कर रायमुलकर (शिवसेना)११२०३८
पराभूत उमेदवार :  अनंत सखाराम वानखेडे(भारतीय राष्ट्रीय कांग्रेस)४९८३६, आबाराव श्रीराम वाघ (वंचीत बहुजन आघाडी)८०५०. [ या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय कांग्रेस व राष्ट्रवादी कांग्रेस एकत्र लढली.]

Comments